
छत्रपती संभाजीनगर, 22 जून (हिं.स.)। पाचोऱ्याकडून बनोटीकडे विनापरवाना अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवाला सोयगाव पोलिसांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल नारायण खोडे यांच्या फिर्यादीवरून हायवा चालक प्रल्हाद चोपडे (वय ३०) याच्याविरुद्ध सोयगाव ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. यात हायवासह पाच ब्रास वाळू (अंदाजे किंमत ३० हजार रु.) असा एकूण २२ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. हायवा क्र. एमएच १४ एमटी ८३७२ हा येत असताना सोयगाव पोलिसांनी निंभोरा गावाजवळ सापळा रचला होता. या कारवाईत पोनि. दिनकर गोरे यांच्या नेतृत्वाखाली गजानन दांडगे, नारायण खोडे, संदीप सुसर, कुणाल जाधव, अजय कोळी, आकाश कुंडकर आदींचा समावेश होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis