चिपळूणमध्ये बुधवारी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
रत्नागिरी, 22 जून (हिं.स.) । जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने
चिपळूणमध्ये बुधवारी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा


रत्नागिरी, 22 जून (हिं.स.) । जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा बुधवार, २४ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता चिपळूणच्या भगवान परशुराम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणार आहे.

जिल्ह्यातील सर्व इच्छुक उमेदवारांनी रोजगार संधीचा लाभ घेण्यासाठी कौशल्य विकास विभागाच्या www.mahaswayam.gov.in या अधिकृत पोर्टलवर आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांची नोंदणी आधीच झालेली आहे, त्यांनी आपले प्रोफाइल (माहिती) त्वरित अद्ययावत करून घ्यावे.

नोंदणीकृत व पात्र उमेदवारांनी बुधवार, २४ जून रोजी होणाऱ्या थेट मुलाखतीसाठी स्वतःचा बायोडाटा आणि सर्व आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या मूळ व झेरॉक्स प्रतींसह निश्चित वेळेत मेळाव्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहावे.

एखाद्या उमेदवाराची अद्याप पोर्टलवर नोंदणी झालेली नसेल, तर त्यांनी नोंदणीसाठी खालील पर्यायांचा वापर करावा : कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन नोंदणी करावी. कार्यालयाच्या (०२३५२) २९९३८५ या दूरध्वनी क्रमांकावर त्वरित संपर्क साधून आपली नोंदणी पूर्ण करावी.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा व आपले भविष्य उज्ज्वल करावे, असे आवाहन कौशल्य विकास व रोजगार केंद्राचे सहायक आयुक्त प्र. मोरेश्वर दुधाळ यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande