
बीड, 22 जून (हिं.स.)।
केज येथील कदमवाडी फाट्यावर अनैतिक संबंधाच्या संशयावरून सुरू असलेले भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या एका हॉटेल चालकाचा चाकू भोकसून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गंभीर जखमी झाल्यानंतर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे केज परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला, तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन वेळा रस्ता रोको आंदोलन केल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
कदमवाडी फाट्यावरील चालक हॉटेलवर बसलेले होते. याच वेळी पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून इतर नातेवाईक तेथे आले.
केज येथील शासकीय रुग्णालयात आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे हलवण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर शहरात निर्माण झालेली कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आणि संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम, पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांच्या मार्गदर्शनाखाली युसुफवडगाव, धारूर आणि नेकनूर येथून पोलिसांचा मोठा फौजफाटा केज शहरात तैनात करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis