
- व्हाईस चेअरमनपदी विद्या पंडित
लातूर, 22 जून (हिं.स.)।
लातूर पंचायत समिती कर्मचारी कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. ता. लातूरची निवडणूक प्रक्रीया नुकतीच बिनविरोध पार पडली. या पतसंस्थेच्या चेअरमनपदी जितेंद्र अनुरथराव बिराजदार, व्हा. चेअरमनपदी विद्या भरत पंडित यांची बिनविरोध निवड पार पडली.
महाराष्ट्र सहकारी संस्था नियम २०१४ च्या तरतुदीनुसार लातूर पंचायत समिती कर्मचारी कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. ता. लातूर या संस्थेची २०२६ ते २०३१ या कालावधीसाठीची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी एस. के. सारोळे यांनी काम पाहिले.
या निवडणूकीत ९ जून रोजी लातूर पंचायत समिती कर्मचारी कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या.
ता. लातूरचे सदस्य म्हणून जितेंद्र अनुरथराव बिराजदार, जयराम विष्णू भोसले, नंदकिशोर अंगदराव काटे, विक्रांतसिंह धनंजय देशमुख, नागनाथ रघूनाथ देशमुख, नितीन रमेशराव सगर, वर्षा वसंतराव शिंदे, विद्या भरत पंडित, निळकंठ विश्वनाथ गुंड,
मनोज पांडूरंग पांचाळ, अनिल प्रभू धनेगावे यांची निवड पार पडली.
पतसंस्थेच्या सदस्य पदाधिकारी निवडीनंतर निवडीसाठी दि. २० जून रोजी पार पडलेल्या निवड बैठकीत पतसंस्थेच्या चेअरमनपदी जितेंद्र अनुरथराव व्हा. चेअरमनपदी बिराजदार, विद्या भरत पंडित, सचिव पदी जयराम विष्णू भोसले, खजिनदार म्हणून मनोज पांडूरंग पांचाळ यांची बिनविरोध निवड पार पडली. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis