
नांदेड, 22 जून (हिं.स.)। हा विजय म्हणजे जनसेवेवर जनतेने दाखवलेला विश्वास आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले. नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, रिपाई (आठवले) व सर्व मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार अमरनाथ राजूरकर यांनी ४५१ पैकी तब्बल ३३९ मते मिळवून ऐतिहासिक विजय संपादन केल्याबद्दल त्यांचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अभिनंदन केले आहे.
आमदार चिखलीकर म्हणाले की, हा विजय म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांतील प्रतिनिधींनी व्यक्त केलेला विश्वास, कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांचे फलित आणि विकासाभिमुख नेतृत्वाला मिळालेली भक्कम पावती आहे. जनतेच्या अपेक्षा व विश्वासाला सार्थ ठरवत आपण नांदेड जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक जोमाने कार्य कराल, असा विश्वास आहे.
उमेदवार अमरनाथ राजूरकर यांचे पुन:श्च खूप खूप अभिनंदन व आपल्या पुढील यशस्वी राजकीय आणि सामाजिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा. जनसेवेच्या माध्यमातून आपण अधिकाधिक लोककल्याणकारी कार्य घडवून आणाल, हीच सदिच्छा.
-----------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis