धाराशिव-लातूर-बीड विधानपरिषदेत महायुतीचा झेंडा; बसवराज पाटील 845 मतांनी विजयी
लातूर, 22 जून (हिं.स.)।धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांनी दणदणीत विजय मिळवत विक्रमी आघाडी नोंदवली. पाटील यांना एकूण 845 मते मिळाली, तर महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांना 124 म
बस्वराज पाटील


लातूर, 22 जून (हिं.स.)।धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांनी दणदणीत विजय मिळवत विक्रमी आघाडी नोंदवली. पाटील यांना एकूण 845 मते मिळाली, तर महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांना 124 मते मिळाली.

तब्बल 721 मतांच्या फरकाने मिळालेल्या या विजयामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.

या निकालामुळे धाराशिव, लातूर आणि बीड या तीन जिल्ह्यांतील राजकीय समीकरणांवर महायुतीचे वर्चस्व अधोरेखित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande