नाशिक महापालिकेत प्रशासकीय फेरबदल; कर विभागाची जबाबदारी नितीन पवारांकडे
नाशिक, 22 जून (हिं.स.) : नाशिक महानगरपालिकेतील कर आकारणी विभागाचे उपायुक्त अजित निकत यांची कोपरगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी गोदावरी संवर्धन विभागाचे उपायुक्त नितीन पवार यांच्याकडे कर विभागाची अतिरिक्त जबाबदारी सो
नाशिक महापालिकेत प्रशासकीय फेरबदल; कर विभागाची जबाबदारी नितीन पवारांकडे


नाशिक, 22 जून (हिं.स.) : नाशिक महानगरपालिकेतील कर आकारणी विभागाचे उपायुक्त अजित निकत यांची कोपरगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी गोदावरी संवर्धन विभागाचे उपायुक्त नितीन पवार यांच्याकडे कर विभागाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. या प्रशासकीय फेरबदलांमध्ये नितीन पवार यांच्याकडे असलेला गोदावरी संवर्धन कक्ष, पर्यावरण विभाग तसेच जनसंपर्क व राजशिष्टाचार विभागाचा अतिरिक्त कार्यभार समाजकल्याण तसेच महिला व बालकल्याण विभागाचे उपायुक्त नितीन नेर यांच्याकडे देण्यात आला आहे.

तसेच उपायुक्त संगीता नांदुरकर यांच्याकडील कामगार कल्याण विभागाची जबाबदारीही नितीन नेर यांच्याकडे सोपविण्यात आली असून, त्यांच्याकडे आता केवळ सुरक्षा विभागाचा कारभार राहणार आहे.

महानगरपालिकेतील या बदलांमुळे प्रशासकीय कामकाज अधिक सुटसुटीत व परिणामकारक होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande