
बीड, 22 जून (हिं.स.)।
धारूर अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाकडून गुटखा, पानमसाला व भेसळयुक्त पदार्थावर राज्यभर छापेमारीचा सिलसिला सुरू असून, धारूर शहरात एफडीएचे विशेष पथक येणार असल्याच्या अफवेने शहरातील काही टपरीधारक, छोटे व्यावसायिक आणि गुटखा विक्रेत्यांमध्ये चांगलीच धावपळ उडाली आहे.
शहरातील अनेक ठिकाणी गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याने एफडीएच्या कारवाईची शक्यता व्यक्त होताच काही विक्रेत्यांनी माल लपवणे, दुकानातील साठा हलविणे, विक्री तात्पुरती बंद ठेवण्याचा मार्ग अवलंबला आहे.
दिवसभर पथक आले का? याची चौकशी सुरू आहे. विशेष म्हणजे, घासून पुडी देणारे आणि गुप्तपणे विक्री करणाऱ्या काही व्यावसायिकांना या अफवेचा सर्वाधिक फटका बसला. कारवाईच्या भीतीने अनेकांनी सावध भूमिका घेतली आहे. नियमित ग्राहकांनाही गुटखा मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
दरम्यान, गुटखा शौकीनांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. नेहमीच्या ठिकाणी गुटखा उपलब्ध न झाल्याने काहीजण शहरभर शोधाशोध करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis