रत्नागिरीतील जलतरणपटू, माजी सैनिक शंकरराव मिलके यांचे निधन
रत्नागिरी, 22 जून (हिं.स.) । रत्नागिरीतील ज्येष्ठ माजी सैनिक तसेच प्रसिद्ध जलतरण प्रशिक्षक शंकरराव मिलके यांचे आज पुण्यात उपचारांदरम्यान दुःखद निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता. त्यांच्यावर पुण्यातील मिलिटरी हॉस्प
शंकरराव मिलके


रत्नागिरी, 22 जून (हिं.स.) । रत्नागिरीतील ज्येष्ठ माजी सैनिक तसेच प्रसिद्ध जलतरण प्रशिक्षक शंकरराव मिलके यांचे आज पुण्यात उपचारांदरम्यान दुःखद निधन झाले.

काही दिवसांपूर्वी त्यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता. त्यांच्यावर पुण्यातील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

शंकरराव मिलके यांनी आपल्या मिलके स्विमिंग अॅकॅडमीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना समुद्रात पोहण्याचे प्रशिक्षण देत उत्कृष्ट जलतरणपटू घडवले. त्यांच्या शिस्तबद्ध प्रशिक्षणामुळे आणि विद्यार्थ्यांविषयी असलेल्या आत्मीयतेमुळे ते सुपरिचित होते. रत्नागिरीतील जलतरण क्षेत्राच्या विकासात त्यांचे मोलाचा योगदान होते.

ते गेली अनेक वर्षे रत्नागिरी शहरातील किल्ला हनुमानवाडी येथे वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

शंकरराव मिलके यांच्या निधनाने माजी सैनिक, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande