विधानपरिषद जिंकली आता सोलापूर-माढा लोकसभेचे संकेत देणारा भाजपचा बॅनर चर्चेत
सोलापूर, 22 जून (हिं.स.)। विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजेंद्र (राजाभाऊ) राऊत यांनी मिळवलेल्या मोठ्या मताधिक्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे या
Ndjs


सोलापूर, 22 जून (हिं.स.)। विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजेंद्र (राजाभाऊ) राऊत यांनी मिळवलेल्या मोठ्या मताधिक्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची राजकीय ताकद आणखी मजबूत झाल्याचे मानले जात आहे.

या विजयाचा जल्लोष सुरू असतानाच सोलापूर शहरात झळकलेल्या एका बॅनरने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. भाजपचे नगरसेवक अक्षय अंजिखाने यांनी लावलेल्या या बॅनरमधून आगामी लोकसभा निवडणुकीचे संकेत दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

विजयानिमित्त पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे अभिनंदन करणाऱ्या या बॅनरवर, विधानपरिषद तो झांकी है, सोलापूर - माढा लोकसभा अभी बाकी है! असा आक्रमक मजकूर झळकत आहे.

या संदेशामुळे भाजपने आगामी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. लोकसभा निवडणुकांना अद्याप वेळ असला तरी या बॅनरमुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून विविध पक्षांमध्ये चर्चांना वेग आला आहे.

दरम्यान, या बॅनरमुळे आगामी काळात सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपकडून लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू झाल्याचा संदेश या माध्यमातून देण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

----------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande