सोलापूर : राजेंद्र राऊत यांचा दणदणीत विजय; मतदारसंघात ३६५ मतांनी प्रतिस्पर्ध्याचा पराभव
सोलापूर, 22 जून (हिं.स.)।सोलापूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून झालेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीचा अधिकृत निकाल जाहीर झाला असून, राजेंद्र विठ्ठल राऊत यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी एस. कार्तिकेयन
Owhs


सोलापूर, 22 जून (हिं.स.)।सोलापूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून झालेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीचा अधिकृत निकाल जाहीर झाला असून, राजेंद्र विठ्ठल राऊत यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी जाहीर केलेल्या अंतिम आकडेवारीनुसार, राऊत यांनी पहिल्या पसंतीच्या मतांमध्येच मोठी आघाडी घेत एकतर्फी विजय मिळवला.

या निवडणुकीत एकूण ६१४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी १३ मते अवैध ठरली, तर ६०१ मते वैध ठरली.

विजयी उमेदवार राजेंद्र राऊत यांना ४८३ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी वसंतराव दौलतराव देशमुख यांना ११८ मते मिळाली. त्यामुळे राऊत यांनी ३६५ मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला.

मतमोजणीतील वर्चस्व

मतमोजणीच्या चारही टेबलवर राजेंद्र राऊत यांनी सुरुवातीपासूनच आघाडी कायम ठेवली. विशेषतः टेबल क्रमांक ४ वर सर्वाधिक १३४ मते मिळवत त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर निर्णायक आघाडी मिळवली.

अधिकृत निकाल जाहीर होताच मतमोजणी केंद्राबाहेर समर्थकांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि जल्लोष करत विजय साजरा केला. सोलापूरच्या राजकीय वर्तुळातून राजेंद्र राऊत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

---------------

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande