सोलापूर ग्रामीण भागातील 1030 गावांवर ग्राम सुरक्षा यंत्रणा बंदीचे सावट
सोलापूर, 22 जून (हिं.स.)। आर्थिक निधीअभावी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरलेली ‘ग्राम सुरक्षा यंत्रणा’ येत्या 30 जून 2026 पासून पूर्णपणे बंद होणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक डी. के. गोर्डे पाटील यांनी दिली आहे. या निर
gfd


सोलापूर, 22 जून (हिं.स.)। आर्थिक निधीअभावी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरलेली ‘ग्राम सुरक्षा यंत्रणा’ येत्या 30 जून 2026 पासून पूर्णपणे बंद होणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक डी. के. गोर्डे पाटील यांनी दिली आहे. या निर्णयाचा जिल्ह्यातील 1030 ग्रामपंचायतींमधील सुमारे 11 लाख 70 हजार 500 नागरिकांवर थेट परिणाम होणार आहे.

जिल्हा परिषद सोलापूर आणि सोलापूर ग्रामीण पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने सप्टेंबर 2021 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना आणि आपत्कालीन माहिती पोहोचविण्यासाठी ही यंत्रणा प्रभावी माध्यम म्हणून कार्यरत होती.

ग्रामसभेच्या तारखा व वेळा, पाणीपुरवठ्याबाबतच्या सूचना, घरपट्टी व पाणीपट्टी भरण्याची माहिती, विविध शासकीय योजनांची माहिती, वन्य प्राणी व बिबट्यांच्या हालचालींचे इशारे, तसेच पूर, भूकंप, वणवा यांसारख्या नैसर्गिक आपत्तींबाबतचे संदेश या यंत्रणेद्वारे नागरिकांपर्यंत तत्काळ पोहोचवले जात होते.

ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या 1800 270 3600 या टोलफ्री क्रमांकावरून केलेला एकच कॉल संबंधित गावातील सर्व नोंदणीकृत नागरिकांच्या मोबाईलवर एकाच वेळी प्रसारित होत होता. प्रशासन आणि नागरिकांनी या सुविधेचा आतापर्यंत 21 हजार 600 हून अधिक वेळा वापर केला आहे.

मात्र, निधीअभावी ही सेवा बंद होत असल्याने संकटकाळात प्रभावी संवादाचे महत्त्वाचे माध्यम ग्रामीण भागातील नागरिकांना गमवावे लागणार असून, प्रशासनासमोरही नवीन पर्याय उभे करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande