लातूर : सर्वोच्च न्यायालयात २१ ते २३ जून दरम्यान विशेष लोकअदालत
लातूर, 22 जून (हिं.स.) : सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथील राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणामार्फत ''समाधान समारोह'' या उपक्रमांतर्गत २१ ते २३ जून २०२६ या कालावधीत सर्वोच्च न्यायालयात ''विशेष लोक अदालतीचे'' आयोजन करण्यात आले आहे. या विशेष लोकअ
लोक अदालत


लातूर, 22 जून (हिं.स.) : सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथील राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणामार्फत 'समाधान समारोह' या उपक्रमांतर्गत २१ ते २३ जून २०२६ या कालावधीत सर्वोच्च न्यायालयात 'विशेष लोक अदालतीचे' आयोजन करण्यात आले आहे. या विशेष लोकअदालतीमध्ये लातूर जिल्ह्यातून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली सर्व प्रकारची प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी व दिवाणी प्रकरणे ठेवण्यात आली असून, यामध्ये प्रामुख्याने बँकिंग, दिवाणी, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई, ग्राहक तक्रार निवारण, परक्राम्य संलेख अधिनियम कलम १३८ अंतर्गत धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणे, कौटुंबिक वाद, कामगार व औद्योगिक वाद, भूसंपादन आणि सेवेशी संबंधित प्रकरणांचा समावेश आहे.

या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित पक्षकारांमध्ये सौहार्दपूर्ण वातावरणात यशस्वी तडजोड व्हावी, या हेतूने नोटिसा बजावण्यात आल्या असून, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लातूरचे सचिव व्यंकटेश गिरवलकर व प्रशिक्षित मध्यस्थ वकील यासाठी निरंतर प्रयत्न करत आहेत. तरी लातूर जिल्ह्यातून सर्वोच्च न्यायालयात दाखल प्रकरणांमधील संबंधित पक्षकारांनी आपले वाद सामोपचाराने मिटवून प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीस संजय भारुका, सचिव व्यंकटेश गिरवलकर आणि लातूर जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष शिवकुमार जाधव यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande