लातूरमध्ये ट्रॅक्टर-पाणी टँकर चोरीचा पर्दाफाश; ९.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त
लातूर, 22 जून (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ व देवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या ट्रॅक्टर, ट्रॅक्टर ट्रॉली व पाणी टँकर चोरीच्या गुन्ह्यांचा पोलीसांनी उलगडा करत एका आरोपीस ताब्यात घेतले असून त्याच्याकडून एकूण ९ लाख २५ हजार रुपयांचा
लातूरमध्ये ट्रॅक्टर-पाणी टँकर चोरीचा पर्दाफाश; ९.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त


लातूर, 22 जून (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ व देवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या ट्रॅक्टर, ट्रॅक्टर ट्रॉली व पाणी टँकर चोरीच्या गुन्ह्यांचा पोलीसांनी उलगडा करत एका आरोपीस ताब्यात घेतले असून त्याच्याकडून एकूण ९ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक लातूर अमोल तांबे यांनी जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांचा तात्काळ उलगडा करून चोरीस गेलेला माल हस्तगत करण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांचे नेतृत्वातील पथकाकडून ठाण्यात दाखल असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली चोरीच्या दोन गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पोलीसांनी गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण व स्थानिक माहितीदारांच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान मुराद मौलासाब खदुभाई (वय २५ वर्षे, रा. नळेगाव, ता. उदगीर) याच्यावर संशय निर्माण झाल्याने त्यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान आरोपीने शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ट्रॅक्टर ट्रॉली चोरीचे गुन्हे तसेच देवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ट्रॅक्टर व पाणी टँकर चोरी केल्याची कबुली दिली.

या कारवाईत आरोपीकडून खालीलप्रमाणे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

१)शिरूर अनंतपाळ पोलीस ठाणे गु.र.नं. १२९/२०२६ मधील लोखंडी ट्रॅक्टर ट्रॉली – किंमत अंदाजे रु. १,६५,०००/-

२)शिरूर अनंतपाळ पोलीस ठाणे गु.र.नं. १३१/२०२६ मधील ट्रॅक्टर ट्रॉली व सिमेंट पाइप – किंमत अंदाजे रु. १,३०,०००/-

३)देवनी पोलीस ठाणे गु.र.नं. १११/२०२६ मधील ट्रॅक्टर व पाणी टँकर – किंमत अंदाजे रु. ६,५०,०००/-

अशा प्रकारे एकूण रु. ९,२५,०००/- किंमतीचा चोरीस गेलेला मुद्देमाल पथकाकडून हस्तगत करण्यात पोलीसांना यश आले आहे.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या उपजीविकेशी निगडित असलेल्या ट्रॅक्टर व ट्रॉली चोरीच्या गुन्ह्यांचा अल्पावधीत उलगडा करून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केल्याबद्दल स्थानिक नागरिक व शेतकरी वर्गाकडून पोलीसांच्या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे. सदर आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असून चोरीच्या इतर गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग आहे का याबाबत पोलीसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande