नंदुरबार : तृतीयपंथीयांसाठी विशेष शासकीय शिबिराचे आयोजन
नंदुरबार, 22 जून (हिं.स.) : केंद्र सरकारच्या तृतीयपंथी हक्क संरक्षण कायद्यांतर्गत जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तींचे शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण करण्यासाठी आज दिनांक 23 जून 2026 रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले असून हे शिबिर जिल्हा परि
नंदुरबार : तृतीयपंथीयांसाठी विशेष शासकीय शिबिराचे आयोजन


नंदुरबार, 22 जून (हिं.स.) : केंद्र सरकारच्या तृतीयपंथी हक्क संरक्षण कायद्यांतर्गत जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तींचे शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण करण्यासाठी आज दिनांक 23 जून 2026 रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले असून हे शिबिर जिल्हा परिषद समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे पार पडेल, अशी माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी कळविली आहे. या शिबिरामध्ये तृतीयपंथीयांना अधिकृत प्रमाणपत्र व ओळखपत्र वाटप केले जाईल. तसेच रेशनकार्ड सहाय्य, विशेष मतदार नोंदणी मोहीम आणि हक्कांच्या संरक्षणासाठी कायदेविषयक मोफत सल्ला व मार्गदर्शन एकाच छताखाली उपलब्ध करून दिले जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीय बांधवांनी या शिबिराला उपस्थित राहून शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त श्री. वसावे यांनी केले आहे. तसेच, स्थानिक सामाजिक संस्था व स्वयंसेवी संघटनांनी या उपक्रमाची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवून सहकार्य करावे, असेही समाज कल्याण सहाय्यक आयुक्त वसावे यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande