आयसीसीची इंग्लंडवर दंडात्मक कारवाई, १२ डब्ल्यूटीसी गुणही वजा
लंडन, २२ जून (हिं.स.)पहिल्यांदाच जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) अंतिम फेरीत पोहोचण्याच्या इंग्लंडच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. ओव्हल येथे न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत धीम्या षटकगतीमुळे इंग्लंडचे १२ डब्ल्यूटीसी गुण वजा करण्यात आले
जो रुट


लंडन, २२ जून (हिं.स.)पहिल्यांदाच जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) अंतिम फेरीत पोहोचण्याच्या इंग्लंडच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. ओव्हल येथे न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत धीम्या षटकगतीमुळे इंग्लंडचे १२ डब्ल्यूटीसी गुण वजा करण्यात आले आहेत.

ओव्हल कसोटीत न्यूझीलंडने इंग्लंडचा २५३ धावांनी पराभव करून तीन सामन्यांची मालिका बरोबरीत आणली. सामन्यानंतर, इंग्लंड १२ षटके उशिरा असल्याचे निश्चित झाले. परिणामी, संघाला त्यांच्या सामना शुल्काच्या ५० टक्के दंड आणि गुणांची कपात करण्यात आली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) म्हटले आहे की, इंग्लंडचा प्रभारी कर्णधार जो रूटने आपली चूक कबूल केली आणि प्रस्तावित शिक्षा स्वीकारली.

या निर्बंधानंतर, इंग्लंड जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत सातव्या स्थानावर कायम आहे. पण त्यांची गुणांची टक्केवारी ३४.७२ वरून २६.३८ पर्यंत घसरली आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत अव्वल दोन संघ पुढील वर्षी लॉर्ड्सवर अंतिम सामन्यात एकमेकांविरुद्ध खेळतील. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका पहिल्या दोन स्थानांवर आहेत.

इंग्लंडचा नियमित कर्णधार, बेन स्टोक्स, नॉटिंगहॅममध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटीसाठी संघात परतणार आहे. दुसऱ्या कसोटीदरम्यान लंडनच्या एका नाइटक्लबमध्ये वेळेची मर्यादा ओलांडल्याबद्दल स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज गस ऍटकिन्सन यांना निलंबित करण्यात आले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande