चारकोपमध्ये 'योगा ऑन स्ट्रीट' उत्साहात; २५०० हून अधिक साधकांची उपस्थिती
मुंबई, २२ जून (हिं.स.) : चारकोप कल्चरल अँड स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वतीने चारकोप मार्केट (कांदिवली पश्चिम) येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सलग १२ व्या वर्षी भव्य ''योगा ऑन स्ट्रीट''चे (रस्त्यावरील योग साधना) यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या उपक
Yoga on street


Yoga on street


मुंबई, २२ जून (हिं.स.) : चारकोप कल्चरल अँड स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वतीने चारकोप मार्केट (कांदिवली पश्चिम) येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सलग १२ व्या वर्षी भव्य 'योगा ऑन स्ट्रीट'चे (रस्त्यावरील योग साधना) यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमासाठी रस्त्याची एक बाजू पूर्णपणे बंद करून सुरक्षित वातावरणात सामूहिक योग साधना घेण्यात आली. यंदा या सोहळ्यात २५०० पेक्षा अधिक योगसाधकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

याप्रसंगी चारकोप विधानसभेचे आमदार श्री. योगेश सागर आणि बोरिवलीचे आमदार श्री. संजय उपाध्याय यांची विशेष उपस्थिती होती.

गुरुपूजा, प्रार्थना आणि योग गीताने शिबिराची सुरुवात झाली. त्यानंतर योग प्रात्यक्षिके, शांती मंत्र आणि राष्ट्रगीताने सकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत हा सोहळा संपन्न झाला. 'आर्ट ऑफ लिविंग'च्या शिक्षिका श्रीमती जयश्री गाणात्रा यांनी कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन केले, तर श्री. सचिन नायक यांनी साधकांकडून सुंदर ध्यानधारणा करून घेतली.

या भव्य उपक्रमात परिसरातील विविध सामाजिक संस्थांचे मान्यवर, बुद्धिजीवी वर्ग, विविध संप्रदाय आणि योग केंद्रांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फाऊंडेशनचे मार्गदर्शक शरद साटम, सचिव संदीप कदम, बालराज डुबक, वैभव चोणकर आणि अन्य कार्यकारी मंडळाच्या सदस्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

या उपक्रमाला देवलकर मेमोरियल ट्रस्ट, एम. के. घारे ज्वेलर्स, सोहम डेव्हलपर्स आणि रोटरी क्लब ऑफ अप्पर कांदिवली यांचे विशेष सहकार्य लाभले, तर 'श्रेष्ठ भारत चॅनल' हे या कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर होते, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री. सुनील अंकम यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande