कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घसरण
- ब्रेंट क्रूडचा भाव प्रति बॅरल 79 डॉलरच्या जवळ नवी दिल्ली, 22 जून (हिं.स.)। अमेरिका आणि इराण यांच्यात स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या शांतता चर्चेनंतर सोमवारी जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घसरण नोंदवली गेली आहे. कच्च्या तेलाच्या पुरवठ्या
drop crude oil prices Brent


- ब्रेंट क्रूडचा भाव प्रति बॅरल 79 डॉलरच्या जवळ

नवी दिल्ली, 22 जून (हिं.स.)। अमेरिका आणि इराण यांच्यात स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या शांतता चर्चेनंतर सोमवारी जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घसरण नोंदवली गेली आहे. कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात अडथळा निर्माण होण्याची शक्यता कमी झाल्याने आणि इराणच्या तेल निर्यातीमध्ये वाढ होण्याची अपेक्षा असल्याने कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सुमारे 3 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात आजच्या व्यवहारादरम्यान आंतरराष्ट्रीय मानांकन असलेल्या ब्रेंट क्रूडचा भाव 0.94 डॉलर म्हणजेच 1.17 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल 79.63 डॉलरच्या आसपास व्यवहार करत आहे. व्यवहाराच्या सुरुवातीला हा भाव प्रति बॅरल 82 डॉलरच्या वर पोहोचला होता.

अमेरिकन वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (डब्ल्यूटीआय) क्रूडचा भाव मात्र 0.11 डॉलर म्हणजेच 0.15 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 75.96 डॉलरवर व्यवहार करत आहे.

तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली ही घसरण भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांसाठी दिलासादायक आहे. मात्र कच्चे तेल स्वस्त झाले तरी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये तात्काळ कपात होण्याची शक्यता कमी आहे. याचे कारण म्हणजे तेल कंपन्या प्रथम आपला खर्च आणि पूर्वीचे नुकसान भरून काढण्याला प्राधान्य देतील.

जागतिक बाजाराचे लक्ष पश्चिम आशियातील परिस्थिती आणि कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर केंद्रित राहणार आहे, कारण पुढील काळातील किंमतींची दिशा मोठ्या प्रमाणात याच घटकांवर अवलंबून असेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande