सोलापूर : २८ जून रोजी टीईटी परीक्षा; सुरक्षेसाठी प्रश्नपत्रिकेत महत्त्वाचे बदल
सोलापूर, 23 जून, (हिं.स.)। राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २८ जून २०२६ रोजी होणार असून, त्यासाठी साडेचार लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. परीक्षेची पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून यंदा क
tet


सोलापूर, 23 जून, (हिं.स.)। राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २८ जून २०२६ रोजी होणार असून, त्यासाठी साडेचार लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. परीक्षेची पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून यंदा काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. यंदा प्रश्नपत्रिकेच्या प्रत्येक पानावर स्वतंत्र क्यूआर कोड देण्यात येणार आहे. तसेच, उमेदवाराने किती प्रश्न सोडविले याची स्वतंत्र नोंद ठेवण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचेपर्यंत संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे.

याबाबत माहिती देताना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे म्हणाले, २८ जून रोजी शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे. त्यासाठी सव्वाचार लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. प्रश्नपत्रिकेच्या प्रत्येक पानावर क्यूआर कोड, प्रश्न सोडविले किती याची नोंद, असे बदल करण्यात आले आहेत. प्रश्नपत्रिका केंद्रावर नेईपर्यंत व्हिडिओ चित्रीकरण आम्ही करणार आहोत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande