
लातूर, 23 जून (हिं.स.)। लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बॅनरवर कारवाई करण्याची सर्व झोन मार्फत विशेष मोहिम घेऊन अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांवर ५० हजार रु दंडाची आकारणी करण्यात आलेली आहे.
लातूर शहरातील सर्व नागरीकांना, सर्व संघटना व राजकीय पक्ष यांना आवाहन करण्यात येते की महानगरपालिकेने निश्चित करुन दिलेल्या जागेव्यत्यारिक्त विरुध्द इतर सार्वजनिक जागेवर व महानगरपालिकेच्या परवानगी शिवाय कोणत्याही ठिकाणी पोस्टर्स / बॅनर्स / होर्डींग्ज / कमानी लावु नयेत याचे उल्लंघन केल्यास प्रस्तुत कायदेचे अंतर्गत दंडनीय कार्यवाही करुन संबंधितांविरुध्द पोलिस कार्यवाही करण्यात येणार आहे.
तेंव्हा महानगरपालिकेची रितसर परवानगी घेवुनच पोस्टर्स/ बॅनर्स / होर्डींग्ज / कमानी लावावेत परवानगी घेतल्यानंतर सदरील जाहिरातीवर महानगरपालिकेचा जाहिरात क्रं. व दिलेला कालावधी दर्शविण्यात यावा असे शहरातील प्रिंटर्स यांची बैठक घेऊन कळविण्यात आलेले आहे. तसेच आपणास याव्दारे विनंती करण्यात येते की, आपण शहरामध्ये वेगवेगळया कार्यक्रमानिमीत्त लावावयाची पोस्टर्स / बॅनर्स / होर्डींग्ज / कमाणी उभारण्यापुर्वी रितसर संबंधित क्षेञिय कार्यालय मनपाची परवानगी घेवुनच उभारावेत.
अनाधिकृत पोस्टर्स/बॅनर/होर्डींग्ज/कमानी लावण्यात येणार नाहीत व मा.न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेवुन महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis