रत्नागिरी : नव्या सोनवी पुलावर दोन अवजड वाहनांचा अपघात
रत्नागिरी, 23 जून, (हिं.स.) । संगमेश्वर तालुक्यातील नवीन सोनवी पुलावर आज सकाळी मुंबई आणि गोव्याकडून येणारी दोन अवजड वाहने पुलावर समोरासमोर धडकल्याने मोठा अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दुर्घटनेत तीन जण किरकोळ जखमी झाल
accident


रत्नागिरी, 23 जून, (हिं.स.) । संगमेश्वर तालुक्यातील नवीन सोनवी पुलावर आज सकाळी मुंबई आणि गोव्याकडून येणारी दोन अवजड वाहने पुलावर समोरासमोर धडकल्याने मोठा अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दुर्घटनेत तीन जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

पुलाच्या दिशेने झालेल्या मोठ्या आवाजामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी घटनास्थळी धाव घेतली असता, दोन अवजड वाहने समोरासमोर धडकल्याचे दिसले. सोनवी पुलाच्या गोवा दिशेकडील मार्गिकेचे काम पूर्ण करून ती वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. पूल पूर्ण नसताना आणि कोणतीही पुरेशी सुरक्षा यंत्रणा, दिशादर्शक फलक किंवा गतिरोधक नसताना एकाच मार्गिकेतून दोन्ही बाजूंनी वाहने समोरासमोर आल्याने अपघात झाला. पुलाचे तीव्र वळण असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज चालकांना आला नाही.

अपघातामुळे पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून मोठी वाहतूक कोंडी झाली होती. संगमेश्वर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आणि वाहने बाजूला करत वाहतूक पूर्ववत केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande