विजयाचे प्रमाणपत्र घेताच आ. प्रवीण पोटे अडसड यांच्या भेटीला
अमरावती, 23 जून (हिं.स.) | विजयाचे प्रमाणपत्र घेतल्यानंतर प्रवीण पोटे थेट भाजपाचे जेष्ठ नेते अरूण अडसड यांचे आशिर्वाद घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले तेथे त्यांचा सत्कार झाला. यावेळी आ. प्रताप अडसड यांच्या मातोश्री प्रतिभा अडसड, धाणगावच्या नगराध्य
विजयाचे प्रमाणपत्र घेत आ.  प्रवीण पोटे पाटीलपोहचले  थेट भाजपाचे जेष्ठ नेते अरूण अडसड यांच्या घरी


अमरावती, 23 जून (हिं.स.) | विजयाचे प्रमाणपत्र घेतल्यानंतर प्रवीण पोटे थेट भाजपाचे जेष्ठ नेते अरूण अडसड यांचे आशिर्वाद घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले तेथे त्यांचा सत्कार झाला. यावेळी आ. प्रताप अडसड यांच्या मातोश्री प्रतिभा अडसड, धाणगावच्या नगराध्यक्ष अर्चना रोठे - अडसड व अन्य कुटुंबीय उपस्थित होते. त्यानंतर पोटे स्वत:च्या घरी गेले तेथे त्यांच्या पत्नी अनुराधा यांनी त्यांचे औक्षण केले. यावेळी मुलगा श्रेयस व मुलगी श्रुती उपस्थित होती.

तेथून पोटे त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात दाखल झाले. येथे त्यांचे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, युवा स्वाभिमान पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. तसेच क्रेडाईसह विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांचा सत्कार केला. यावेळी सलग ढोलताशांचा निनाद सुरू होता. प्रत्येक व्यक्ती पोटे यांना पेढा भरवून त्यांचे अभिनंदन करता होता. त्यांच्या कार्यालयाला जत्रेचे स्वरूप आले होते.

दरम्यानच्याच काळात शहरभर त्यांच्या अभिनंदनाचे होर्डिंग लागले होते. जनसंपर्क कार्यालयातून निघाल्यावर पोट यांनी इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर ते थेट राजापेठ स्थित भाजपा कार्यालयात आले. तेथेही त्यांचे कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. जवळपास सर्वच ठिकाणी भाजपा नेते प्रा. दिनेश सूर्यवंशी, शिवराय कुळकर्णी यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande