





रत्नागिरी, 23 जून, (हिं.स.) । राज्य शासनाच्या कृषी, पशुसवंर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने २०२३ आणि २०२४ या वर्षांचे विविध कृषी पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यात २०२३ करिता २ आणि २०२४ करिता ४ असे एकूण जिल्ह्यातील ६ जणांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.
पुरस्कारविजेते असे - २०२३ -
वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार (१ लाख २० हजार, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र) ठाणे विभागात डॉ. शैलेश सुभाषचंद्र शिंदेदेसाई, ओणी, ता. राजापूर.
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) (रु. ४४ हजार, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र) अनंत बाबाजी खांबे, मु. पो. मांडकी, ता.चिपळूण.
२०२४ -
वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार (२ लाख, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र) ठाणे विभागात आनंद जयंत देसाई मु. पो. पावस ता. रत्नागिरी.
वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार (१ लाख २० हजार, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र) ठाणे विभागात पत्रकार मेहरून हमीद नाकाडे, मु. पो. नेवरे, ता. रत्नागिरी.
उद्यान पंडित पुरस्कार , (रु. १ लाख, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र) ठाणे विभागात धनंजय श्रीकृष्ण केतकर, मु. पो. भिले, ता. चिपळूण.
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट)- (रु. ४४ हजार, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र) दयानंद बाबाजी चौगुले, मु. पो. गावठाणवाडी, खरवते , ता. राजापूर
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या पुरस्कारांची निवड करण्यात आली आहे. पुरस्कारप्राप्त शेतकरी पती व पत्नी दोघांचा येत्या १ जुलै रोजी कृषी दिनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते सन्मान होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी