सैन्य सरावादरम्यान अमरावतीचे जवान पराग मोरेंना वीरमरण; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
अमरावती, 23 जून (हिं.स.) : स्थानिक खंडेलवालनगर येथील रहिवासी व भारतीय सैन्य दलातील जवान पराग सुरेशराव मोरे सैन्य दलातील सरावादरम्यान शहीद झाले. त्यांच्यावर सोमवारी सायंकाळी शासकीय इतमामात स्थानिक हिंदू स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पर
सरावा दरम्यान गोळी लागून आले वीरमरण सैन्य दलाच्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


अमरावती, 23 जून (हिं.स.) : स्थानिक खंडेलवालनगर येथील रहिवासी व भारतीय सैन्य दलातील जवान पराग सुरेशराव मोरे सैन्य दलातील सरावादरम्यान शहीद झाले. त्यांच्यावर सोमवारी सायंकाळी शासकीय इतमामात स्थानिक हिंदू स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पराग मोरे (४३) वयाच्या अठराव्या वर्षी भारतीय सैन्य दलात दाखल झाले होते. सध्या विशाखापट्टनम ते येथे भारतीय सैन्य दलाच्या तुकडीत होते. दोन दिवसापूर्वी सरावादरम्यान बंदुकीची गोळी लागल्याने त्यांना मरण पराग मोरे आले. त्यांचे पार्थीव शरीर त्यांच्या घरी आणण्यात आले. पराग मोरे यांच्या पश्चात पत्नी, आई, लहान भाऊ, तीन वर्षाची एक मुलगी व पाच वर्षाचा एक मुलगा तसेच विवाहीत बहिण व बराच मोठा आप्त परिवार आहे. पराग मोरे यांची अंत्ययात्रा सोमवारी साईनगर परिसरातील खंडेलवाल नगर येथील महर्षी अपार्टमेंटमधून काढण्यात आली.

अंत्ययात्रेच्या वाहनास फुलांनी सजविण्यात आले होते. यावेळी पराग मोरे अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्यात. स्थानिक हिंदू स्मशान भूमी येथे विशाखापट्टनम येथील भारतीय सैन्य दलातील अधिकारी, शहर पोलीस दलातील अधिकारी यांचेसह साईनगर, खंडेलवाल नगर व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहीद पराग मोरे यांना भारतीय सैन्य दलाच्या वतीने जवानांनी बंदूकीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना देण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande