
येवला, 23 जून (हिं.स.) : भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी, येवला शहर मंडलाच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. विंचूर रोडवरील ‘शिवसृष्टी’ येथे मंगळवारी आयोजित कार्यक्रमात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भाजपाचे जिल्हा महामंत्री आनंद शिंदे यांच्या हस्ते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या राष्ट्रसेवेचे स्मरण करत आदरांजली अर्पण केली.भाजपा शहराध्यक्ष मीननाथ पवार यांनी आपल्या भाषणात डॉ. मुखर्जी यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या राष्ट्रहितासाठीच्या योगदानावर प्रकाश टाकला. तसेच भाजपा प्रदेश सदस्य प्रमोद (पप्पू) सस्कर यांनीही मनोगत व्यक्त करत डॉ. मुखर्जी यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भाजपा विणकर आघाडीचे शहराध्यक्ष निलेश परदेशी यांनी केले.
---------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV