नाशिक - सिंहस्थ प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीची मागणी
नाशिक, 23 जून, (हिं.स.)। आगामी २०२७ चा सिंहस्थ कुंभमेळा भव्य, सुव्यवस्थित आणि जागतिक स्तरावर आदर्श ठरण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार
नाशिक - सिंहस्थ प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीची मागणी


नाशिक, 23 जून, (हिं.स.)। आगामी २०२७ चा सिंहस्थ कुंभमेळा भव्य, सुव्यवस्थित आणि जागतिक स्तरावर आदर्श ठरण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दत्तू बोडके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सिंहस्थाशी संबंधित विकासकामे वेगाने, पारदर्शकपणे आणि भ्रष्टाचारमुक्त पद्धतीने पूर्ण होतील, असा विश्वास बोडके यांनी व्यक्त केला. नाशिकमधील रस्त्यांची दुरवस्था, खड्डेमय मार्गांमुळे होणारे अपघात, तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत खोदलेले आणि अपूर्ण राहिलेले रस्ते यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध असूनही अनेक विकासकामे संथ गतीने सुरू असून, काही ठिकाणी निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे त्यांच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कुंभमेळ्यासाठी तुलनेने कमी कालावधी शिल्लक असताना शहरातील अपूर्ण कामे, खराब रस्ते आणि अपुरे नियोजन चिंताजनक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande