जळगाव : मोटारसायकल अपघातात दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
जळगाव, 23 जून (हिं.स.) : पाळधी-सावदा रस्त्यावर दोन मोटारसायकलच्या समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुः
अपघात लोगो


जळगाव, 23 जून (हिं.स.) : पाळधी-सावदा रस्त्यावर दोन मोटारसायकलच्या समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पथराड येथील किरण बाबूलाल राक्षे आणि बाबूलाल शामराव राक्षे हे पद्मालय येथे आयोजित लग्न समारंभ आटोपून मोटारसायकलने आपल्या गावी परतत होते. यावेळी पाळधी-सावदा मार्गावर समोरून येणाऱ्या दुसऱ्या मोटारसायकलीशी त्यांची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. या अपघातात निंभोरा (ता. सोयगाव) येथील प्रदीप उखा निकम (वय ४०) आणि पथराड येथील किरण बाबूलाल राक्षे यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर दोघांना तातडीने वैद्यकीय मदतीसाठी हलविण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.मोटारसायकलवर मागे बसलेले चेतन पाटील (वय ३५, रा. वाडे-गुढे, ता. भडगाव) तसेच बाबूलाल शामराव राक्षे हे गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने उपचारासाठी जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेतअपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी दोन्ही वाहनांचा वेग आणि समोरासमोर झालेली जोरदार धडक यामुळे मोठी जीवितहानी झाल्याचे बोलले जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande