
परभणी, 23 जून (हिं.स.)। परभणी जिल्ह्याचे पालक सचिव म्हणून तुकाराम मुंडे यांच्या ऐवजी ग्रामविकास पंचायतराज विभागातील सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव हेमंत महाजन यांनी मंगळवार 23 जून रोजी एका अध्यादेशाद्वारे नव्या पालक सचिवांची नियुक्ती केली. तुकाराम मुंडे हे या जिल्ह्यात पुर्वी पालक सचिव म्हणून नियुक्त केल्या गेले होते. परंतु, नियुक्तीपासून ते आजतागायतपर्यंत ते या जिल्ह्यात दाखल झालेच नाहीत. आज ना उद्या ते येतील म्हणून या जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तूळाचे त्यांच्या दौर्याकडे लक्ष लागले होते. दुर्देवाने मुंडे यांच्या नियुक्तीपासूनच्या पहिल्या दौर्यापूर्वीच सामान्य प्रशासन विभागाने डॉ. पुलकुंडवार यांच्या नियुक्तीचा आदेश दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis