जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सुरू
जळगाव, 23 जून, (हिं.स.) १३-जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २० जून २०२६ पासून सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर २२ जून रोजी मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विनय गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सुरू


जळगाव, 23 जून, (हिं.स.) १३-जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २० जून २०२६ पासून सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर २२ जून रोजी मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विनय गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा निवडणूक नायब तहसिलदार नवीनचंद्र भावसार, संगणक चालक नितीन माळी, तसेच राजकीय पक्षाचे प्रतिनिधी राहुल वाघ, पितांबर भावसार, वाय.एस.महाजन, जमील शेख, गजानन देशमुख उपस्थित होते.

बैठकीत मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी उपस्थित प्रतिनिधींना मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाचे अधिकृत वेळापत्रक सविस्तर समजावून सांगितले. तसेच मतदार यादीतील त्रुटी (अनोमली) दूर करणे, मॅप व अन मॅप मतदार याबाबत प्रशासनातर्फे विशेष मार्गदर्शन करण्यात आले. SIR प्रणालीचे फायदे व तोटे यावरही बैठकीत सखोल चर्चा झाली. मतदार यादी अत्यंत अचूक आणि पारदर्शक व्हावी यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या मतदान केंद्रांवर तात्काळ 'बूथ लेव्हल एजंट' नियुक्त करावेत, असे आवाहन मतदान नोंदणी अधिकाऱ्यांनी याप्रसंगी केले. सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी प्रशासनाच्या या मोहिमेला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande