
नांदेड, 23 जून (हिं.स.) : युवासेना उबाठा सचिव कृष्णा पाटील आष्टीकर यांची हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. नांदेड विधान परिषद प्रधिकार मतदार संघाच्या निवडणूक निकालानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेना उबाठा गटाला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर कृष्णा पाटील आष्टीकर यांनी शिवसेनेत असल्याचे सांगितले होते. त्यावेळी शिवसेनेच्या नेत्यां सुषमा अंधारे यांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यावर जहीरी टिका केली होती. त्या टिकेला युवासेना सचिव कृष्णा पाटील आष्टीकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे शिवसेना उबाठा गटाच्या गटात खळबळ माजली होती.
खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे चिरंजीव कृष्णा पाटील आष्टीकर हे नांदेड विधान परिषद प्रधिकार मतदार संघातून शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले होते. २२ जून रोजी नांदेड विधान परिषद प्रधिकार निवडणूकीचा निकाल जाहीर होताच कृष्णा पाटील यांच्यावर कारवाई करण्याचे हत्यार उगारण्यात आले आहे. शिवसेना उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी निवडणूक निकालानंतर कृष्णा पाटील आष्टीकर यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना दुहेरी धक्का बसला आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis