लातूर - महेश नवमी सोहळा भव्य, दिव्य शोभायात्रेने होणार साजरा
लातूर, 23 जून, (हिं.स.)। लातूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही दि. २३ व २४ जून २०२६ रोजी विविध उपक्रमांनी महेश नवमी साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने भव्य शोभा यात्रा, संस्कारक्षम व्याख्यान, धार्मिक उपक्रम, सांस्कृतिक
महेश नवमी


लातूर, 23 जून, (हिं.स.)। लातूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही दि. २३ व २४ जून २०२६ रोजी विविध उपक्रमांनी महेश नवमी साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने भव्य शोभा यात्रा, संस्कारक्षम व्याख्यान, धार्मिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमांसह पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महेश नवमीचे औचित्य साधून लातूर शहरातील छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील गौरीशंकर मंदिरापासून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शोभायात्रेदरम्यान माहेश्वरी ढोल ताशा पथक विशेष आकर्षण राहणार आहे. शोभा यात्रेचे संयोजक ईश्वर बाहेती, संतोष तोष्णीवाल, गणेश हेड्डा, नंदकिशोर लोया, राहुल लोया, ईश्वर चांडक, दिनेश गिल्डा हे आहेत. स्नेहभोजनाचा कार्यक्रम

गोदावरीदेवी लाहोटी कन्या प्रशाला येथे होईल. याच ठिकाणी रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्याप्रसंगी लातूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष सीए प्रकाश कासट, सचिव राजेशकुमार मंत्री, अ . भा. महासभा सदस्य हुकूमचंद कलंत्री, फुलचंद काबरा, बालकिशन मुंदडा महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी महिला

संगठनच्या प्रदेश सचिव अनिता मालू, आदींची उपस्थिती राहणार आहे. तरी लातूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीने श्री महेश नवमी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सर्व उपक्रमात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन लातूर जिल्हा माहेश्वरी महासभेचे अध्यक्ष सीए प्रकाश कासट यांच्यासह आयोजकांनी केले आहे.

बुधवार, दि. २४ जून रोजी दुपारी चार वाजता दयानंद सभागृहात माहेश्वरी समाजासाठी आपला अमूल्य वेळ, श्रम एवं यथाशक्ती आर्थिक सहयोग देणाऱ्या मान्यवरांना महेश भूषण, महेश गौरव, महेश सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो.चे सचिव अनिलकुमार नावंदर यांचे मार्गदर्शन होणार आहे.

यावर्षीच्या महेश नवमी उत्सवाच्या स्नेहभोजनाचे यजमानपद यंदा तोष्णीवाल परिवाराला मिळाले आहे. लातूर जिल्हा महिला माहेश्वरी संगठनच्या वतीने शिवस्य नवारसामृतम ही भव्य दिव्य नृत्य नाटिका सादर केली जाणार आहे. यावेळी माहेश्वरी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande