
लातूर, 23 जून, (हिं.स.)। नीटच्या दुबार परीक्षेनंतर आता वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी समुपदेशन केंद्र (कॉन्सलींग सेंटर) च्या नावाखाली 'पाट्या' लावून दुकाने थाटली असून अशा च्या नावाखाली 'पाट्या' लावून दुकाने थाटली असून अशा केंद्र चालकाकडून वैद्यकीय प्रवेश घेऊन ईच्छिणाऱ्यांच्या पालकांची आर्थिक लूट होते. कमी गुण ग्रामीण भागातील विद्यार्थी, गरीब विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. खासगी शिकवणीप्रमाणे येथे शासनाचे कोणतेही नियंत्रण नाही.
एकट्या लातूर शहरामध्ये १०० हून अधिक अशी समुपदेशन केंद्र पाट्या लावून आहेत. पाट्या लावून दुकान थाटले कि त्याला काही तरी नियम असतात पण जैसे आपल्याकडे मान्यताप्राप्त खासगी शिकवणी वर्ग चालावेत अशी सेंटर चालू आहेत. वैद्यकीयसाठी प्रवेश मिळवून देण्यासाठी पालकांची आर्थिक लूट आणि विद्यार्थ्यांवर अन्या होत आहे.
६०० पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना कोठे ना कोठे प्रवेश मिळतो, पण ४००-४५०, ५००-५५० गुण मिळविणारे विद्यार्थी प्रवेशाच्चय मोफत सल्ल्याअभावी प्रवेशापासून वंचित राहतात आणि एवढेच गुण घेणारे पण पैसे मोजून सल्ला घेणारे (प्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयाचे एजंटाची
मदत घेणारे) ठराविक वर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. आश्चर्य याचे आहे की लातूर 'शिक्षणाचा पॅटर्न' म्हणून प्रसिद्ध आहे. अशा शहरातील व जिल्ह्यातील कोणत्याही महाविद्यालयाकडे अथवा खासगी शिकवणी वर्ग चालकाकडे 'वैद्यकीय प्रवेश समुपदेशन केंद्र' नाही. गरिब, ग्रामीण
भागातील विद्यार्थ्यांचे पालक 'कॉन्सलींग केंद्र' चालकाची फेरीनिहाय फी भरू शकत नाहीत, असे विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशाला मुकतात. हा त्यांच्यावर अन्याय आहे. पण, अशा समुपदेशन केंद्र व केंद्र चालकावर कोणतेही नियंत्रण नाही. नीट सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील योग्य सल्ल्या अभावी विद्यार्थ्यांना प्रवेशापासून मुकावे लागते. लातूर शहरात १०० हून अधिक अशी वैद्यकीय प्रवेश मिळवून देणारे केंद्र आहेत. ज्यांची उलाढाल काही कोटींच्या घरात आहे. तात्पर्य जे श्रीमंत आहेत. मोठ्यांची मुलं-मुली आहेत. जे पैसे मोजू शकतात असे कमी हुशार असलेली मुलं गरीब व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मागे टाकून 'डॉक्टर' बनतात. यावर गांभीर्याने विचार झाला पाहिजे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis