पहिल्याच मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील जनजीवन विस्कळित
रत्नागिरी, 23 जून, (हिं.स.) । पहिल्याच मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात दमदारपणे बरसायला सुरुवात केली आहे. आज दिवसभरात पडलेल्या पावसाने जनजीवन पार विस्कळित झाले आहे. आज (दि. २३ जून) सकाळी संपलेल्या २४ तासांमध्ये रत्नागिरीत सर्वाधिक ९१ मिलिमीटर
रत्नागिरीत मुसळधार पाऊस


रत्नागिरी, 23 जून, (हिं.स.) । पहिल्याच मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात दमदारपणे बरसायला सुरुवात केली आहे. आज दिवसभरात पडलेल्या पावसाने जनजीवन पार विस्कळित झाले आहे.

आज (दि. २३ जून) सकाळी संपलेल्या २४ तासांमध्ये रत्नागिरीत सर्वाधिक ९१ मिलिमीटर, तर गुहागर तालुक्यात ७६ मिलिमीटर पाऊस पडला. राजापुरात ४७, दापोलीत ४५, खेडमध्ये ४१, चिपळूण आणि संगमेश्वरमध्ये प्रत्येकी ३१, तर लांजा आणि मंडणगडमध्ये प्रत्येकी २९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

सकाळपासूनच सुरू असलेली अतिवृष्टी आणि सोबत आलेल्या जोरदार वाऱ्यांमुळे काही ठिकाणी झाडे पडली. तसेच काही ठिकाणी महामार्गावर पाणी साचल्याच्याही घटना घडल्या. रत्नागिरी तालुक्यात काल संध्याकाळी सुरू झालेला पाऊस आजही दिवसभर बरसत होता. अधूनमधून प्रचंड जोरदार सरी कोसळत असल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande