राष्ट्रीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत परभणी मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
परभणी, 23 जून, (हिं.स.)। परभणी येथील आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या ''परभणी मेडिकल कॉलेज, आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट''च्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत महाविद्यालयाचा आणि परभणी शहराचा नावलौकिक उंचावला आहे.
राष्ट्रीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत परभणी मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश


परभणी, 23 जून, (हिं.स.)। परभणी येथील आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या 'परभणी मेडिकल कॉलेज, आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट'च्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत महाविद्यालयाचा आणि परभणी शहराचा नावलौकिक उंचावला आहे.

आंतरराष्ट्रीय क्लिनिकल ट्रायल्स दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षातील एमबीबीएस विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला. देशभरातील ७२ वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये ही स्पर्धा रंगली होती.

या स्पर्धेत पंचम आल्हाट, अंजली पवार आणि योगेश ननकानी या विद्यार्थ्यांच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय स्थान मिळविले. त्यांच्या या यशामुळे परभणी मेडिकल कॉलेजची राष्ट्रीय स्तरावर विशेष दखल घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामागे महाविद्यालयाच्या औषधशास्त्र (फार्माकॉलॉजी) विभागाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांमध्ये वैद्यकीय संशोधन, क्लिनिकल ट्रायल्स आणि औषधशास्त्राविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच त्यांच्या ज्ञानाला व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश होता.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्रमुख आमदार डॉ. राहुल पाटील, अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचा तसेच मार्गदर्शक प्राध्यापक डॉ. ओरूज फातिमा यांचा सत्कार करून अभिनंदन केले. यापुढेही अशा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी उज्ज्वल यश संपादन करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande