नांदेडमध्ये २६ जून रोजी राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा
नांदेड, 23 जून (हिं.स.) : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्सच्या वतीने शुक्रवार, 26 जून रोजी दुपारी 12 वाजता नवीन नांदेड सिडको येथील कामगार कल्याण केंद्राच्या सभागृहात ‘छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाजभूषण
नांदेडमध्ये २६ जून रोजी राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा


नांदेड, 23 जून (हिं.स.) : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्सच्या वतीने शुक्रवार, 26 जून रोजी दुपारी 12 वाजता नवीन नांदेड सिडको येथील कामगार कल्याण केंद्राच्या सभागृहात ‘छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचे’ भव्य आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सायलू दादा म्हैसेकर उपस्थित राहणार आहेत. तर ज्येष्ठ नेते सय्यद मुजीम भाई यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्सचे संस्थापक बा.रा. वाघमारे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.

सोहळ्यात ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. जे.टी. जाधव आणि मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थितांना संबोधित करणार आहेत.

यावेळी भंते पय्याबोधी, वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.पी. घुंगरवार, प्रा. डॉ. सुनीलचंद्र सोनकांबळे, अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्सचे प्रदेशाध्यक्ष डी. एस. वाघमारे, ज्येष्ठ नेते पी. एस. गवळे, डॉ. गणपत वाडेकर आणि सुजाताताई पोहरे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक समता, शिक्षण आणि बहुजन कल्याणाच्या विचारांचा जागर करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande