नाशिक - भाजपा कार्यालयात डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अभिवादन
नाशिक, 23 जून, (हिं.स.)। भारतीय जनसंघाचे संस्थापक, प्रखर राष्ट्रवादी विचारवंत तथा देशाच्या एकात्मतेसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करणारे डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपा नाशिक महानगर जिल्हा वसंतस्मृती कार्यालयात भाजपा प्रदेश
नाशिक - भाजपा कार्यालयात डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अभिवादन


नाशिक, 23 जून, (हिं.स.)। भारतीय जनसंघाचे संस्थापक, प्रखर राष्ट्रवादी विचारवंत तथा देशाच्या एकात्मतेसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करणारे डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपा नाशिक महानगर जिल्हा वसंतस्मृती कार्यालयात भाजपा प्रदेश चिटणीस रोहिणी नायडू, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, महानगर सरचिटणीस सुनील देसाई, रश्मी बेंडाळे, मनपा गटनेते ॲड.शाम बडोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.

डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या राष्ट्रनिष्ठ, एकात्मतावादी आणि प्रेरणादायी कार्याचा गौरव करण्यात आला. देशाच्या अखंडतेसाठी आणि राष्ट्रहितासाठी त्यांनी दिलेले योगदान प्रत्येक कार्यकर्त्यास आजही प्रेरणा देणारे असून, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.

यावेळी ज्येष्ठ नेते काशिनाथ शिलेदार, मंडल अध्यक्ष वसंत उशीर, उदय जोशी, पवन गुरव, युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रवीण भाटे, प्रशांत वाघ, सुरेश मारू, सुनील पनीकर, रामहरी संभेराव, रवींद्र पाटील, अनिता भामरे, पार्थ मानकर, महेश भामरे, गोपी रजपूत, रफिक शेख, भरत शिरसाठ, शिवा जाधव, निखिल खोडे, अरुण दातीर, श्रीकांत खांदवे, अमोल गांगुर्डे, योगेश कुलकर्णी, शिवम शिंपी, प्रदीप पाटील, अभय छल्लाणी, ओझरकर, रेणुका गायकवाड, लेखा जोसेफ यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande