छ. संभाजीनगर - शिरसाट यांच्या निवडीने फुलंब्रीच्या राजकारणात नव्या पर्वाची नांदी
छत्रपती संभाजीनगर, 23 जून, (हिं.स.)। प्रवास आता ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून सुरू झालेला सुहास शिरसाट यांचा राजकीय विधान परिषदे पर्यंत पोहोचला आहे. या घडामोडीकडे केवळ स्थानिक नव्हे, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या राजकारणातील एक महत्त्वाचा बदल
छ. संभाजीनगर - शिरसाट यांच्या निवडीने फुलंब्रीच्या राजकारणात नव्या पर्वाची नांदी


छत्रपती संभाजीनगर, 23 जून, (हिं.स.)। प्रवास आता ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून सुरू झालेला सुहास शिरसाट यांचा राजकीय विधान परिषदे पर्यंत पोहोचला आहे. या घडामोडीकडे केवळ स्थानिक नव्हे, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या राजकारणातील एक महत्त्वाचा बदल म्हणून पाहिले जात आहे. सुहास शिरसाट यांनी २००० मध्ये काँग्रेस पक्षातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. तीन वेळा सरपंच व नंतर फुलंब्री नगरपंचायतीचे पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान त्यांनी मिळवला.

फुलंब्री मतदारसंघात आता विधानसभा स्तरावर अनुराधा चव्हाण आणि विधान परिषदेत सुहास शिरसाट असे भाजपचे दोन प्रभावी नेते आहेत. यामुळे विकास निधी आणि प्रशासकीय पाठपुराव्याला गती मिळण्याची अपेक्षा आहे. शिरसाट यांच्या विजयामुळे जिल्ह्यातील भाजप संघटनेला अतिरिक्त बळ मिळाले असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर याचा थेट प्रभाव पडणार आहे. मतदारसंघात भाजपची ताकद दुप्पट झाल्यामुळे आगामी काळात विरोधी पक्षांसमोर मोठे राजकीय आव्हान उभे राहणार आहे. आगामी काळात फुलंब्री हे जिल्ह्याच्या राजकारणाचे नवे सत्ताकेंद्र ठरू शकते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande