नाशिक जिल्ह्याला नवीन महसूल कार्यालयांची भेट
नागरिकांच्या कामांना गती देण्यासाठी शासनाचा निर्णय, राज्यात 88 नवे कार्यालय सुरू होणार नाशिक, 23 जून (हिं.स.)। राज्यामध्ये नागरिकांच्या कामांना गती मिळावी म्हणून महसूल विभागाने आपल्या कार्यालयांचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला असून राज्यामध्य
Sinnarla Provincial Office


नागरिकांच्या कामांना गती देण्यासाठी शासनाचा निर्णय, राज्यात 88 नवे कार्यालय सुरू होणार

नाशिक, 23 जून (हिं.स.)। राज्यामध्ये नागरिकांच्या कामांना गती मिळावी म्हणून महसूल विभागाने आपल्या कार्यालयांचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला असून राज्यामध्ये नव्याने काही कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील सिन्नरला उपविभागीय अधिकारी तर लासलगाव सिन्नर नामपुर या ठिकाणी अप्पर तहसीलदार कार्यालय मिळणार आहे.

राज्यामध्ये महायुतीचे सरकार आल्यानंतर प्रशासकीय कामांना नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये त्यांचे कामे गतिमान पद्धतीने व्हावे म्हणून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. या साठी म्हणून काही प्रशासकीय कार्यालयांमध्ये बदल करण्याचे काम सध्या सुरू आहे. तर काही विभागांमध्ये प्रशासकीय बदल करून नवीन कार्यालय सुरू करण्यात येत आहे. राज्यामध्ये विधान परिषद निवडणूक सुरू असल्यामुळे महसूल विभागाने यापूर्वी घोषित केलेल्या राज्यात प्रशासकीय कामकाजामध्ये बदल करत काही नवीन कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घोषित केला होता.

निवडणुकीची आचारसंहिता समताच आता याबाबत कक्षा अधिकारी अजित देशमुख यांनी एक आदेश मंगळवारी 23 जून रोजी काढला असून त्यामध्ये राज्यात 88 नवीन प्रशासकीय कार्यालय सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी ,प्रांत अधिकारी, तहसीलदार आणि अप्पर तहसीलदार यांची नवीन कार्यालय सुरू होणार आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्याला सिन्नर येथे उपविभागीय म्हणजे प्रांत कार्यालय मिळणार आहे. यापूर्वी सिन्नर तालुका हा निफाड उपविभागीय कार्यालयाशी जोडला गेलेला होता. या ठिकाणी निफाड येवला आणि सिन्नर असे तीन तालुके जोडले गेले होते. आता यामध्ये बदल होऊन सिन्नरला स्वतंत्र उपविभागीय अधिकारी मिळणार आहे. याशिवाय उत्तर महाराष्ट्र मध्ये म्हणजे धुळ्याला साक्री आणि जळगावला जामनेर या ठिकाणी देखील उपविभागीय म्हणजे प्रांत कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.

तर नाशिक जिल्ह्यात एकही तहसील कार्यालय सुरू होणार नाही मात्र तीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्यात येणार आहे यामध्ये सिन्नरला गोंदे नांदुर-शिंगोटे वावी वडांगळी पांगरी बुद्रुक देवपूर आणि शहा या गावांसाठी अप्पर जिल्हाधिकारी असतील तर लासलगाव येथे निफाड चांदोरी सायखेडा रानवड पालखेड पिंपळगाव बसवंत आणि ओझर यासाठी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय असेल नामपुर ला सटाणा मुजवाड ब्राह्मणगाव डान्स सौंदाणे किकवारी या गावांसाठी अप्पर तहसीलदार कार्यालय असणार आहे. उत्तर महाराष्ट्र मध्ये जामनेर ,नंदुरबार, शहादा, मोलनी, शिरपूर शहर राजुर घोडेगाव, जळगाव शहर चाळीसगाव या ठिकाणी अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande