सोलापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील ५ दिवस वादळी पावसाचा इशारा
सोलापूर, 23 जून (हिं.स.)। भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांना पुढील पाच दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हा अलर्ट २४ जूनपर्यंत लागू राहणार असून, जिल्ह्यात मेघगर्जन
सोलापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील ५ दिवस वादळी पावसाचा इशारा


सोलापूर, 23 जून (हिं.स.)। भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांना पुढील पाच दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हा अलर्ट २४ जूनपर्यंत लागू राहणार असून, जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. २२ ते २6 जून या कालावधीत सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आकाश ढगाळ राहून ठिकठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

या काळात नागरिकांनी विशेषतः विजांच्या कडकडाटावेळी मोकळ्या जागेत थांबू नये तसेच आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान, राज्यात मान्सूनची प्रगती पुन्हा वेग घेत असून पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनी हवामान अपडेट्सवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande