अल्पसंख्याक कारागिरांना बळ देणारी केंद्राची ‘उस्ताद’ योजना
लातूर, 23 जून (हिं.स.)। भारत सरकारच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाने देशातील पारंपरिक कला आणि शिल्पाचा अनमोल वारसा जतन करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यासाठी मंत्रालयाने विशेष ‘उस्ताद’ कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. उस्ताद चे पूर्ण नाव “वि
उस्ताद योजना


लातूर, 23 जून (हिं.स.)। भारत सरकारच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाने देशातील पारंपरिक कला आणि शिल्पाचा अनमोल वारसा जतन करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यासाठी मंत्रालयाने विशेष ‘उस्ताद’ कार्यक्रमाची सुरुवात केली आहे.

उस्ताद चे पूर्ण नाव “विकासासाठी पारंपरिक कला/हस्तकलांमधील कौशल्ये आणि प्रशिक्षणाचे उन्नयन” असे असून, या योजनेचा मुख्य उद्देश अल्पसंख्याक समुदायातील कारागीर, हस्तकला कलाकार आणि तरुणांच्या कौशल्याचा विकास करणे हा आहे.

या योजनेअंतर्गत पारंपरिक कला, हस्तकला आणि शिल्पकलेला आधुनिक बाजारपेठेशी जोडण्याचा प्रयत्न केला जातो. कारागिरांना प्रशिक्षण, कौशल्यवृद्धी, मार्केटिंग आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.

विशेषतः तरुण पिढीला पारंपरिक कलेबद्दल आकर्षित करून हा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे, तसेच आर्थिक सक्षमीकरण साधणे हा या योजनेचा महत्त्वाचा भाग आहे. उस्ताद योजना केवळ सांस्कृतिक वारसा जपण्यासाठीच नव्हे, तर अल्पसंख्याक समाजातील युवकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठीही प्रभावी ठरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande