रायगड -अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
रायगड, 23 जून (हिं.स.)। खालापूर तालुक्यातील कारगाव हद्दीतील गोठण परिसरात पाली-खोपोली मार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून त्याचा सहप्रवासी जखमी झाला आहे. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाल्याने खालापूर प
Two-wheeler rider killed after being hit by an unidentified vehicle; case registered at Khalapur Police Station.


रायगड, 23 जून (हिं.स.)। खालापूर तालुक्यातील कारगाव हद्दीतील गोठण परिसरात पाली-खोपोली मार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून त्याचा सहप्रवासी जखमी झाला आहे. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाल्याने खालापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण बबन हिंदोळा हे त्यांच्या ताब्यातील यामाहा एफझेड (एमएच-४६ सीजी-११७७) दुचाकीवर हरी लक्ष्मण काष्टे यांना मागे बसवून पालीकडून खोपोलीच्या दिशेने जात होते. कारगाव गावाच्या हद्दीतील गोठण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी ते पोहोचले असता, समोरून खोपोलीकडून पालीच्या दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की, नारायण हिंदोळा यांच्या डोक्याला व चेहऱ्यावर गंभीर दुखापती झाल्या. अतिरक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर मागे बसलेले हरी काष्टे हे देखील जखमी झाले. अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.

अपघात घडल्यानंतर संबंधित वाहनचालकाने जखमींना मदत न करता अथवा पोलिसांना माहिती न देता घटनास्थळावरून पलायन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५२/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम १८४ व १३४/१८७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक बांगर करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande