विश्वास नांगरे पाटील नागपूरचे नवे पोलीस आयुक्त
नागपूर, 23 जून (हिं.स.) : नागपूर शहराच्या पोलीस आयुक्तपदी मोठा प्रशासकीय बदल करण्यात आला असून विद्यमान पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राज्याचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची नागपूरच
विश्वास नांगरे पाटील, पोलिस आयुक्त


नागपूर, 23 जून (हिं.स.) : नागपूर शहराच्या पोलीस आयुक्तपदी मोठा प्रशासकीय बदल करण्यात आला असून विद्यमान पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राज्याचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची नागपूरचे नवे पोलीस

सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) अपर पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत असलेले नांगरे पाटील आता नागपूर शहराची कायदा व सुव्यवस्था सांभाळणार आहेत. तर डॉ. सिंगल यांच्याकडे एसीबीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विश्वास नांगरे पाटील हे त्यांच्या कडक शिस्तीच्या कार्यपद्धतीसाठी, प्रशासनिक धडाडी आणि जनसामान्यांशी थेट संवादासाठी ओळखले जातात. मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान ताज हॉटेल ऑपरेशनमध्ये त्यांनी आघाडीवर राहून महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या शौर्यासाठी त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. यापूर्वी त्यांनी मुंबई सह-आयुक्त (कायदा व सुव्यवस्था), नाशिक पोलीस आयुक्त आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करत आपला ठसा उमटवला आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही ते प्रेरणास्थान मानले जातात. नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी असल्याने त्यांच्या अनुभवाचा आणि कडक प्रशासकीय शैलीचा शहरातील कायदा व सुव्यवस्थेला फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande