
मुंबई, 23 जून (हिं.स.)। पूंछ या जम्मूच्या सीमावर्ती भागातील युवक युवतींच्या एका शिष्टमंडळाने आज महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची महाराष्ट्र लोकभवन येथे सदिच्छा भेट घेतली. भारतीय सैन्यदलाच्या सद्भावना मोहिमेंतर्गत या भेटीचे आयोजन करण्यात आले. राज्यपालांनी सर्व विद्यार्थ्यांची आपुलकीने चौकशी केली व त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पाचपैकी तीन युवती राष्ट्रीय स्तरावर हॉकी खेळाडू असून एका विद्यार्थिनीला आयएएस करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मौलवी फरीद मलिक, शबनम परवीन, नवाझ मेहमूद, उमर अब्दुल्ला खान, मुबशीर अहमद, शाहिस्ता मजीद, आदिल मजीद, शबीना परवीन व नसीम फातिमा हे उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर