माजी कर्णधार रोहित शर्माला पद्मश्री, तर टेनिसपटू विजय अमृतराज यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली, 23 जून (हिं.स.)भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार प्रदान केले. महान भारतीय टेनिसपटू विजय अमृतराज यांना पद्मभूषण, तर
रोहित शर्मा


नवी दिल्ली, 23 जून (हिं.स.)भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार प्रदान केले. महान भारतीय टेनिसपटू विजय अमृतराज यांना पद्मभूषण, तर महिला हॉकी संघाच्या माजी कर्णधार सविता पुनिया यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्याचा हा दिवस रोहित शर्मा आणि त्याच्या लाखो चाहत्यांसाठी खूप भावनिक आणि खास ठरला, कारण या सन्मानासोबतच त्याच्या आयुष्यात एक अद्भुत योगायोगही जोडला गेला आहे. रोहित शर्मासाठी 23 जून हा दिवस इतिहासाच्या पानांवर कायमचा कोरला गेला आहे. बरोबर १९ वर्षांपूर्वी, २३ जून २००७ रोजी, रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले पाऊल ठेवले होते. त्याने आयर्लंडमधील बेलफास्ट येथे खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात भारतासाठी पदार्पण केले होते. नियतीचा एक अद्भुत योगायोग म्हणजे, ज्या दिवशी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १९ यशस्वी वर्षे पूर्ण केली, त्याच दिवशी भारत सरकारने त्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.

रोहित २०२५ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला, पण तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी एक महत्त्वाचा क्रिकेटपटू आहे. गेल्या वर्षी त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६५० धावा केल्या आणि संघासाठी सातत्याने योगदान दिले. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने २०२४ चा टी-२० विश्वचषक आणि २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.

भारतीय महिला हॉकी संघाच्या गोलरक्षक सविता पुनिया यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी दीर्घकाळ भारतीय महिला हॉकी संघाच्या बचावाला बळकटी दिली आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील आपल्या कामगिरीने देशाला गौरव मिळवून दिला आहे. यावर्षी पद्मभूषण पुरस्कार मिळवणारे विजय हे एकमेव खेळाडू आहेत. पद्मभूषण हा भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. अमृतराज यांना यापूर्वी भारतीय क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या दीर्घकालीन योगदानाबद्दल १९८३ मध्ये पद्मश्री आणि १९७४ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande