होर्मुझ सामुद्रधुनीत अडकलेल्या ११ हजारांहून अधिक खलाशांच्या सुटकेसाठी यूएनची मोहीम सुरु
तेहरान , 24 जून (हिं.स.)।युद्ध संपवण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या करारानंतर संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेने (आयएमओ) होर्मुझ सामुद्रधुनीत अडकलेल्या ११ हजारांहून अधिक खलाशांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बचाव म
अमेरिका-इराण करारानंतर यूएनची होर्मुझमध्ये अडकलेल्या ११ हजारांहून अधिक खलाशांच्या सुटकेसाठी मोहीम


तेहरान , 24 जून (हिं.स.)।युद्ध संपवण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या करारानंतर संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेने (आयएमओ) होर्मुझ सामुद्रधुनीत अडकलेल्या ११ हजारांहून अधिक खलाशांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बचाव मोहीम सुरू केली आहे.

वृत्तानुसार, आयएमओचे महासचिव आर्सेनियो डोमिंग्वेझ यांनी सांगितले की, ही मोहीम इराण, ओमान, या प्रदेशातील इतर किनारी देश, अमेरिका आणि सागरी उद्योग क्षेत्रातील भागीदारांच्या सहकार्याने राबवली जात आहे. डोमिंग्वेझ म्हणाले, “आम्ही आवश्यक सुरक्षा हमी मिळवल्या आहेत आणि या मोहिमांना पाठिंबा देण्यासाठी सुरक्षित नौवहनाच्या अटींची सखोल पडताळणी केली आहे.”

२८ फेब्रुवारीला संघर्ष सुरू झाल्यानंतर इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केली होती. त्यानंतर अनेक महिने या महत्त्वाच्या सागरी मार्गातील वाहतूक ठप्प झाली होती. आता जहाजांची वाहतूक हळूहळू पूर्ववत होत असली, तरी होर्मुझ सामुद्रधुनीच्या भविष्यातील व्यवस्थापनावरून मतभेद कायम आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande