एफआयएच प्रो लीग : भारताचा पाकिस्तानवर ७-१ ने ऐतिहासिक विजय
लंडन, 27 जून (हिं.स.) भारतीय पुरुष हॉकी संघाने एफआयएच प्रो लीग २०२५-२६ मध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ७-१ ने पराभूत करत शानदार कामगिरी केली. लंडनमधील ली व्हॅली हॉकी आणि टेनिस सेंटरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात, सुरुवातीला एक गोल स्वीकार
भारतीय हॉकी संघ


लंडन, 27 जून (हिं.स.) भारतीय पुरुष हॉकी संघाने एफआयएच प्रो लीग २०२५-२६ मध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ७-१ ने पराभूत करत शानदार कामगिरी केली. लंडनमधील ली व्हॅली हॉकी आणि टेनिस सेंटरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात, सुरुवातीला एक गोल स्वीकारल्यानंतर भारताने जोरदार पुनरागमन करत पाकिस्तानला सामन्यातून पूर्णपणे बाहेर काढले. दोन दिवसांपूर्वीच्या ४-३ च्या निसटत्या विजयानंतर, भारतीय संघ या सामन्यात अधिक आक्रमक दिसला. भारताने दुसऱ्या आणि तिसऱ्या क्वार्टरमध्ये सलग गोल करून पाकिस्तानी बचावाला पूर्णपणे खिंडार पाडले.

भारताकडून सुखजीत सिंग (१९ व्या मिनिटाला), कर्णधार हरमनप्रीत सिंग (२६ व्या मिनिटाला), हार्दिक सिंग (३४ व्या मिनिटाला, पेनल्टी स्ट्रोक), जुगराज सिंग (३५ व्या मिनिटाला), अभिषेक (४१ व्या मिनिटाला), राजकुमार पाल (४३ व्या मिनिटाला) आणि दिलप्रीत सिंग (५३ व्या मिनिटाला) यांनी प्रत्येकी एक गोल केला. दरम्यान, पाकिस्तानचा एकमेव गोल अबू महमूदने १३ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर केला. मिडफिल्डमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत गोल करणाऱ्या हार्दिक सिंगला त्याच्या उत्तम कामगिरीबद्दल एफआयएच प्लेयर ऑफ द मॅच म्हणून गौरविण्यात आले.या विजयासह, भारताने सर्व स्तरांवर पाकिस्तानविरुद्ध आपला सलग १७ वा विजय नोंदवला आणि गेल्या दशकातील आपले वर्चस्व कायम राखले.

या विजयामुळे, भारत १५ सामन्यांतून १७ गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर पोहोचला आहे. भारताने स्पेनला (१६ गुण) मागे टाकले आहे. दुसरीकडे, पाकिस्तान १५ सामन्यांत सलग १५ व्या पराभवाला सामोरे जात, अजूनही एकाही गुणाशिवाय गुणतालिकेत तळाशी आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande