जपानमध्ये रिश्टर स्केलवर ६.१ तीव्रतेचा भूकंप
टोकियो , 28 जून (हिं.स.)।जपानमध्ये रविवारी सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले.या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.१ इतकी होती. या भूकंपानंतर कोणत्याही प्रकारचा सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही. तसेच, आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जीवित किंवा
जपानमध्ये रिश्टर स्केलवर ६.१ तीव्रतेचा भूकंप


टोकियो , 28 जून (हिं.स.)।जपानमध्ये रविवारी सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले.या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.१ इतकी होती. या भूकंपानंतर कोणत्याही प्रकारचा सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही. तसेच, आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

जपान हवामानशास्त्र संस्थेच्या माहितीनुसार, हा भूकंप स्थानिक वेळेनुसार रविवारी सकाळी ७.२५ वाजता इवाते प्रांताच्या किनारपट्टीलगत हा भूकंप झाला. त्याची खोली सुमारे ४० किलोमीटर होती. या भूकंपाचे धक्के आओमोरी प्रांतासह आसपासच्या अन्य भागांमध्येही जाणवले.या भूकंपानंतर कोणत्याही प्रकारचा सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही. तसेच, आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, वारंवार होत असलेल्या भूकंपांमुळे भूस्खलनाची भीती नागरिकांमध्ये वाढली आहे.

जपान हा भूकंप आणि सुनामीसाठी अतिसंवेदनशील देश मानला जातो. गेल्या काही दिवसांत तेथे अनेक भूकंपांची नोंद झाली आहे. त्यामध्ये गुरुवारी याच परिसरालगत ७.२ रिश्टर तीव्रतेचा मोठा भूकंप झाला होता. सुरुवातीला या भूकंपाची तीव्रता कमी असल्याचे सांगण्यात आले होते; मात्र नंतर ती सुधारित करून ७.२ इतकी असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

जपान हवामानशास्त्र संस्थेने पुढील काही दिवसांत आणखी भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच, शुक्रवारी माउंट फुजी परिसरात आणि टोकियोच्या पश्चिमेकडील यामानाशी प्रांतात ५.६ रिश्टर तीव्रतेचा आणखी एक भूकंप नोंदविण्यात आला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande