
नवी दिल्ली, 28 जून (हिं.स.)२०२६ च्या विश्वचषकासाठी आफ्रिकेतील १० देशांनी पात्र ठरून इतिहास घडवला. शनिवारी रात्री काँगोने उझबेकिस्तानचा ३-१ असा पराभव केला आणि अल्जेरियाने ऑस्ट्रियाविरुद्ध ३-३ अशी रोमांचक बरोबरी साधली; यानंतर आता आफ्रिकेचे नऊ संघ बाद फेरीसाठी पात्र ठरले आहेत. यापूर्वी केवळ सहा आफ्रिकन देश बाद फेरीसाठी पात्र ठरले होते. एकाच वर्षात सर्वाधिक दोन संघ पात्र ठरण्याची घटना २०१४ आणि २०२२ मध्ये घडली होती.
या वर्षीच्या स्पर्धेने आफ्रिकन फुटबॉलची सखोल ताकद सिद्ध केली आहे. 'राउंड ऑफ ३२' मध्ये केप वर्दे आणि काँगो यांसारख्या अनपेक्षित संघांचा समावेश आहे. पुढील सामन्यात इंग्लंडचा सामना करणे हे काँगोसाठी मोठे आव्हान असेल, परंतु सध्या तरी हा संघ या क्षणाचा आनंद घेत आहे. सामन्यानंतर फिस्टन मायेले म्हणाला, आमच्या देशासाठी, काँगोसाठी ही खरोखरच ऐतिहासिक घटना आहे. हा आमचा पहिला विजय आणि पहिली बाद फेरी आहे. आज मला अभिमान वाटत आहे आणि माझ्या देशात सर्वत्र लोक आमच्या कामगिरीवर आनंदी आहेत. आम्हाला काँगोवासी असल्याचा अभिमान आहे आणि मला वाटते की आमची ही वाटचाल अशीच सुरू राहील.
या वर्षीच्या विश्वचषकातील सर्वात रोमांचक शेवट असलेल्या सामन्यानंतर अल्जेरियाने पुढची फेरी गाठली. स्टॉपेज टाइममध्ये ऑस्ट्रियाविरुद्ध सामना २-२ असा बरोबरीत होता आणि संघ बरोबरीवरच समाधान मानतील असे वाटत होते; मात्र कर्णधार रियाद महारेझने अचानक गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. दोन मिनिटांनंतर सामन्याच्या अगदी शेवटच्या क्षणी ऑस्ट्रियाने प्रत्युत्तर देत गोल केला. पण बरोबरीचा निकाल दोन्ही संघांना पुढच्या फेरीत जाण्यासाठी पुरेसा ठरला.
काँगोच्या विजयानंतर, 'प्लेअर ऑफ द गेम'चा पुरस्कार सोबत असताना विसाने आपल्या देशाचा या टप्प्यापर्यंत पोहोचण्याचा प्रदीर्घ प्रवासाचे वर्णन केले. विसा म्हणाला, ५२ वर्षांनंतर आम्ही दुसऱ्यांदा विश्वचषकात सहभागी झालो आहोत. चार वर्षांपूर्वी या गटासह आम्ही विश्वचषकासाठी पात्र ठरण्याच्या प्रवासाला सुरुवात केली होती. पोर्तुगालविरुद्धचा पहिला सामना बरोबरीत सुटला. कोलंबियाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. आता १० मिनिटांनंतरच आपण १-० ने पिछाडीवर आहोत; थोडक्यात सांगायचे तर, फुटबॉलमध्ये काहीही सोपे नसते. आपल्याला केवळ जिद्द आणि चिकाटी दाखवण्याची गरज आहे. आणि जेव्हा अशी वेळ येते, तेव्हा त्याचा आनंद घेतला पाहिजे, कारण हे आव्हान सोपे नसते.
विसाला आशा आहे की, या विश्वचषकातील यश हे दर्शवते की आफ्रिकन फुटबॉल संघांचे भविष्य उज्ज्वल आहे आणि तरुण खेळाडू त्यासाठी नवी वाट तयार करत आहेत. आता प्रत्येक आफ्रिकन संघ मोठी स्वप्ने पाहू शकतो. मागील विश्वचषकात मोरोक्कोने उपांत्य फेरी गाठली होती. आता मला वाटते की आठ संघ आहेत, असे विसा म्हणाले. आफ्रिकन संघांसाठी पुढचा काळ चांगला आहे. आता सर्वात तरुण फुटबॉलपटू लवकर संधी मिळवताना दिसत आहेत. आम्ही आमच्या संघात सादिकी आणि मुकाऊ यांना संधी दिली आहे, ही चांगली गोष्ट आहे. यावरून हेच दिसून येते की आमची फेडरेशन मोठी स्वप्ने पाहू शकते.
मोरोक्को, दक्षिण आफ्रिका, सेनेगल, आयव्हरी कोस्ट, घाना, केप वर्दे, इजिप्त, काँगो आणि अल्जेरिया हे संघ 'राऊंड ऑफ ३२' साठी पात्र ठरले आहेत. चार वर्षांपूर्वी कतारमध्ये झालेल्या विश्वचषकात उपांत्य फेरी गाठणारा मोरोक्को हा पहिला आफ्रिकन देश ठरला होता. ब्राझीलविरुद्धचा सामना १-१ ने बरोबरीत राखल्यामुळे, हा संघ पुन्हा एकदा स्पर्धेत मोठी मजल मारण्यास सक्षम असल्याचे दिसून येते. तसेच, २०३० मधील विश्वचषकासाठी हा देश सहयजमानही आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे