एचडीएफसी लाईफ आणि टाटा डिजिटल समूह यांच्यात धोरणात्मक भागीदारी
* टाटा न्यूच्या ग्राहकांना आता एचडीएफसी लाईफच्या उत्पादनांची आणि सेवांची सुविधा उपलब्ध होणार मुंबई, 29 जून (हिं.स.) : भारतातील आघाडीच्या खासगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या एचडीएफसी लाईफने टाटा डिजिटलची उपकंपनी असलेल्या टाटा फिनटेकसोबत कॉर्पो

 
partnership

 
* टाटा न्यूच्या ग्राहकांना आता एचडीएफसी लाईफच्या उत्पादनांची आणि सेवांची सुविधा उपलब्ध होणार

मुंबई, 29 जून (हिं.स.) : भारतातील आघाडीच्या खासगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या एचडीएफसी लाईफने टाटा डिजिटलची उपकंपनी असलेल्या टाटा फिनटेकसोबत कॉर्पोरेट एजन्सी भागीदारी केली आहे. या भागीदारीअंतर्गत टाटा न्यू या भारतातील मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या लॉयल्टी आणि वित्तीय सेवा अॅपवर एचडीएफसी लाईफची उत्पादने आणि सेवा उपलब्ध होणार आहेत.

या भागीदारीमुळे कंपनीच्या संरक्षण आणि गुंतवणूकविषयक उपाययोजना टाटा न्यूच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतील. त्यामुळे या अॅपच्या विद्यमान आणि नव्या लाखो ग्राहकांना त्यांची आर्थिक उद्दिष्टे सहजपणे नियोजित करता येतील.

या भागीदारीबाबत एचडीएफसी लाईफच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विभा पाडळकर म्हणाल्या, भारतामध्ये बहुतांश उत्पादने आणि सेवांचा वापर डिजिटल माध्यमातून करण्याकडे वेगाने कल वाढत आहे. टाटा डिजिटल समूहासोबतची आमची भागीदारी आम्हाला टाटा न्यू अॅपच्या माध्यमातून डिजिटल तंत्रज्ञानाशी सुसंगत ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत करेल. त्यांच्या संरक्षण आणि गुंतवणुकीच्या गरजांचे नियोजन त्यांना सहजपणे करता येईल. भारताला अधिक सुरक्षित बनविण्याचे आमचे ध्येय समान आहे. अधिकाधिक भारतीयांना स्वाभिमानाने जगता यावे, यासाठी आमचे दोन्ही ब्रँड कटिबद्ध आहेत.

टाटा डिजिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सजित शिवानंदन म्हणाले, टाटा न्यूमध्ये ग्राहकांच्या वित्तीय आणि जीवनशैलीविषयक गरजा विश्वासार्ह आणि अखंड डिजिटल अनुभवातून सुलभ करण्याचा आमचा प्रयत्न असतो. एचडीएफसी लाईफसोबतच्या सहकार्यामुळे आमच्या जीवन विमा उपाययोजनांची व्याप्ती अधिक मजबूत झाली आहे. ग्राहकांना त्यांचे आर्थिक भविष्य अधिक सहजपणे नियोजित करता येईल. त्याचे संरक्षणही करता येईल.

ही भागीदारी अधिकाधिक ग्राहकांना जीवन विम्याकडे त्यांच्या आर्थिक नियोजनाचा महत्त्वाचा भाग म्हणून पाहण्यास प्रोत्साहित करेल, असा आम्हाला विश्वास आहे. टाटा न्यूच्या माध्यमातून ही सुविधा त्यांना केव्हाही आणि कुठेही विश्वासार्ह पद्धतीने उपलब्ध होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande