१४ सुवर्ण, ७ रौप्य पदक,१६ कांस्य पदक मिळवून महाराष्ट्र राज्याने मिळवले विजेतेपद
नाशिक, 29 जून (हिं.स.)। : 14 व्या राष्ट्रीय स्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेचे आयोजन इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोशियनने छत्रपती संभाजीनगर मार्गावरील जनार्दन स्वामी आश्रमाच्या सर्वेश्वर महादेव ट्रस्
Maharashtra State won the


नाशिक, 29 जून (हिं.स.)।

: 14 व्या राष्ट्रीय स्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेचे आयोजन इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोशियनने छत्रपती संभाजीनगर मार्गावरील जनार्दन स्वामी आश्रमाच्या सर्वेश्वर महादेव ट्रस्टच्या इनडोअर हॉल येथे २५ ते २८ जून २०२६ रोजी केले होते. सिंगा, मकान, प्रि टिन, सब ज्युनियर व ज्युनियर या वयोगटातील खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये २८ राज्य व ८ केंद्र शासित प्रदेशातील १९०० खेळाडू सहभागी झाले. १४ सुवर्ण, ७ रौप्य पदक,१६ कांस्य पदक मिळवून महाराष्ट्र राज्याने या स्पर्धेत प्रथम क्रमांकाची ट्रॉफी मिळवत विजेतेपदाला गवसणी घेतली.स्पर्धेचा उद्घाटन समारंभ २८ जून रोजी सायंकाळी ८ वाजता आयोजित करण्यात आला होता. या सोहळयास पिंपळगाव मर्चंट बँकेचे सीईओ मा. भोजराज जैन , इंडियन पिंच्याक सिल्याट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर येवले, सचिव तारीख जर्गर आदी मान्यवर उपस्थित होते. १४ सुवर्ण, ७ रौप्य पदक,१६ कांस्य पदक मिळवून महाराष्ट्र राज्याने प्रथम क्रमांकाची ट्रॉफी मिळवून आपले स्थान अबाधित ठेवले.१० सुवर्ण,४ रौप्य पदक ,२ कांस्य पदक मिळवून उत्तराखंड राज्याने दुसऱ्या क्रमांचे स्थान मिळवले.९ सुवर्ण,१४ रौप्य,१७ कांस्य पदक मिळवून जम्मू आणि काश्मीर राज्याने तिसऱ्या क्रमांकावर होते. आणि ७ सुवर्ण, ६ रौप्य आणि ७ कांस्य पदके मिळवून ओडिसा राज्याने चौथा क्रमांक पटकावला.तसेच उत्कृष्ट खेळाडू रुद्र येवले - महाराष्ट्र, इंद्रा बनसोडे महाराष्ट्र, निर्मयी भानुशाली - महाराष्ट्र, दनस्वी शर्मा - दिल्ली, अहमद ताह, मोहम्मद अलीम - जम्मू आणि काश्मीर, आदिना नईम - छत्तीसगड,सुजित - चंदिगढ या खेळाडूंना गौरवण्यात आले.महाराष्ट्र पिंच्याक सिल्याट चे पदाधिकारी तृप्ती बनसोडे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.इंडियन पिंच्याक सिल्याट फेडरेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर येवले, यांनी खेळाडूंचे कौतुक केले व पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेकरिता केतन गुंजाळ, निलेश गाढवे , लक्ष्मण दातीर,नागेश बनसोडे, योगेश पानपाटील, आकाश धबडगे, धनंजय जगताप, अंशुल कांबळे ,अनुज सरनाईक, संकेत धामणे ,सुरेखा येवले ,भरत जाधव ,गौतम केदारे, अमोल कदम, अरविंद शिर्के, अश्विनी राऊत, पल्लवी म्हात्रे, पौर्णिमा तेली यांचे सहकार्य लाभले. स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडली.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande